Tuesday, December 24, 2024

/

बेळगाव पोलिसांकडून दोन दुचाकी चोरटे गजाआड

 belgaum

मार्केट पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक करून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष शिवप्पा बेव्हिकोप्प वय 29 रा.इंचल सवंदत्ती आणि अबुबकर सिकंदर सवदी वय 21 रा. श्रीनगर गार्डन बेळगाव अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट 2023 रोजी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडेबाजार रोडवर पार्क केलेल्या मोटारसायकली चोरीस गेल्याप्रकरणी मार्केट पोलीस स्टेशन बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत चोरट्यांना अटक केली आहे.Market police

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मार्केट एसीपी भरमनी , मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश के धमन्नावर, पीआय मार्केट यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सदस्यांचा समावेश असलेल्या टीमचे नेतृत्व केले.

पोलिसांनी आरोपीकडून एकूण 6 बाइक्स, ज्यांची किंमत रु. 2,40,000/- जप्त करण्यात आली आहेत यामध्ये स्प्लेंडर-3, सीडी डिलक्स-1, अॅक्टिव्हा-1 आणि हिरो मेस्ट्रो-1 या दुचाकींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.