Tuesday, January 7, 2025

/

डीडीपीआय पदासाठी तू तू मैं मैं….

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव जिल्ह्यातल अधिकारी पद मिळवण्यासाठी अधिकारी राजकीय वजन आर्थिक वजन देऊन जोरदार पणे प्रयत्न करत असतात. सध्या डी डी पी आय अर्थात जिल्हा शिक्षणाधिकारी पद मिळवण्यासाठी दोन अधिकाऱ्यात चुरस पाहायला मिळत असून दोघेही एकमेकांस खो.. देत आहेत

काल पर्यंत ए बी पुंडलिक हे बेळगावचे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी होते पण मंगळवारी(22 आगस्ट) त्यांची बदली झाली असून बसवराज नलतवाड यांनी पुन्हा एकदा डी डी पी आय पदाची सूत्रे स्वीकारली आहेत त्यामुळे या दोन अधिकाऱ्यातील खो खो ची स्पर्धा आणि तू तू मैं मैं पुन्हा एकदा समोर आली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून या दोन अधिकाऱ्यात रस्सीखेच सुरूच असून मंगळवारी नलतवाड यांनी पदभार स्वीकारत पुंडलिक यांना खो दिला आहे.या अगोदर पुंडलिक यांनी नलतवाड यांना हटवत आपली नियुक्ती करवून घेतली होती मात्र आता पुन्हा नलतवाड यांनी के ई टी जात पुंडलिक यांच्या त्या आदेशाला स्थगिती मिळवत पुन्हा आपली नियुक्ती करवून घेतली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या या सुरक्षित जिल्ह्यातील आमदार देखील बेजार झाले आहेत त्यांनी यात हस्तक्षेप करून दोन अधिकाऱ्यात समन्वय आणण्याची गरज व्यक्त होत आहे.बेळगाव जिल्ह्याचे शिक्षण खाते देखील या दोन अधिकारी येथील चाललेली चुरस शीतयुद्ध खो-खो आणि संघर्ष जवळून पाहत आहे.Ddpi transffer

के ई टी चा आधार घेत नलतवडे यांनी पुन्हा एकदा डी डी पी आय पदी नियुक्ती करवून घेतली असली तरी ए बी पुंडलिक हे उच्च न्यायालयात जाऊन या आदेशाला आव्हान देणार आहेत त्यामुळे दोन अधिकाऱ्यातील हा संघर्ष बेळगाव जिल्ह्यातील जनतेला आणखी पाहायला मिळणार आहे.बदली प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या घटना या दोन अधिकारी वर्गातील चुरशीत समोर येत आहेत.

सध्या अनेक कॉलेज प्राथमिक शाळा यांच्या नवीन शिक्षकांच्या नेमणुका करण्याचे काम सुरू आहे त्यातील मालिदा लाटण्यासाठी डी डी पी आय पदासाठीची ही चुरस चालू आहे. दोन अधिकाऱ्यातील ही तुंबळ युद्ध पहाता यात किती मालीदा असेल याची चर्चा शिक्षक वर्गात रंगत आहे.

असाच बदलीचा संघर्ष सुरूच राहिल्यास बेळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था, त्याची प्रशासकीय व्यवस्था कोलमडणार नाही का?त्याच्या कार्यप्रणाली वर कोणता परिणाम होणार याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि स्थानिक आमदारांनी यावर पर्याय काढायला हवा अशीही मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.