बँक ऑफ इंडिया सर्कल शहापूर ते जुना पीबी रोड या रस्त्याचे अशास्त्रीय पद्धतीने रुंदीकरण करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आप नेते राजीव टोपण्णावर आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी शुक्रवारी (दि. 18) जिल्हाधिकार्यांकडे केली.
भाजप लोकप्रतिनिधींच्या फायद्यासाठी स्मार्ट सिटीने या रस्त्याचे काम केले आहे. पण, या रस्त्यावर रहदारीची मोठी समस्या असल्याची तक्रार त्यांनी निवेदनात केली आहे.
स्मार्ट सिटीने केलेल्या अशास्त्रीय रस्ता रुंदीकरणामुळे अन्याय झालेले कुटुंबीय न्यायालयात गेले असता न्यायालयाने बेळगाव स्मार्ट सिटीला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे स्मार्ट सिटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी अभियंते, पीएमसी कंपनी, ट्रॅक्ट टेबल इंडिया यांनी नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी केली आहे.
या प्रकरणातील खर्या आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली असून या रस्त्यावरील रहदारी सुरळीत न झाल्यास एसबीआय सर्कल येथे रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान त्या मालमत्ताधारकाने आपली मालमत्ता पुन्हा घेतली कब्जा घेतल्यामुळे या रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे लवकरात लवकर ही ट्रॅफिक ची समस्या देखील सोडवावी अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.