बेळगाव लाईव्ह :देशात अल्पावधीत सुप्रसिद्ध झालेल्या एंपियर कंपनीची ‘मॅग्नस -ईएक्स’ ही पर्यावरण पूरक, ध्वनी विरहित अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर यश ऑटो शोरूमच्या दालनात उपलब्ध असून डिजिटल स्पीडोमीटर, रिव्हर्स ऑप्शन, मोबाईल चार्जिंग आदी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असलेली ही विजेवर चालणारी स्कूटर सर्वांना वापरता येईल अशी ‘फॅमिली स्कूटर’ आहे, अशी माहिती शहरातील यश ऑटो शोरूमचे मालक शिवसंत संजय मोरे यांनी दिली.
बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने निमंत्रणावरून कॉलेज रोडवरील यश ऑटो शोरूमला भेट दिली असता संजय मोरे बोलत होते. मोरे म्हणाले की, यश ऑटो गेल्या 25 वर्षापासून कॉलेज रोडवरील आपल्या सर्व्हिस सेंटरच्या लाखो ग्राहकांना आपली सेवा देत आले आहे. कांही वर्षांपूर्वी आम्ही यश ऑटो शोरूम सुरू केले असून मागील 3 वर्षापासून आम्ही आमच्या दालनात इलेक्ट्रिक क्षेत्रातील सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर देत आहोत. बेळगाव जिल्ह्याचे एंपियर इलेक्ट्रिक स्कूटरचे आम्ही अधिकृत वितरक असून आमच्याकडे या दुचाकीची विक्री, सर्व्हिसिंग केली जाते आणि स्पेअरची उपलब्धता करून दिली जाते.
एंपियरच्या मॅग्नस -ईएक्स या दुचाकीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पर्यावरण पूरक आहे. पेट्रोल रहित असलेली ही दुचाकी बेळगावचे प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणारी आहे. विजेवरील असल्यामुळे या दुचाकीद्वारे वायू प्रदूषण तर होतच नाही शिवाय ध्वनी प्रदूषणही होत नाही. त्याचबरोबर पेट्रोलची बचत होऊन त्यासाठीचा खर्च वाचतो. एंपियर ही कंपनी गेल्या 15 वर्षापासून इलेक्ट्रिक दुचाकी तयार करत असून आतापर्यंत त्यांची 7-8 अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मॉडेल्स बाजारात आली आहेत. यापैकी ‘मॅग्नस ईएक्स’, ‘झील’ आणि ‘प्रायमस’ ही तीन मॉडेल्स आमच्या दालनात उपलब्ध आहेत.
ट्यूबलेस टायर, हाय व लो बीम एलईडी हेडलाईट, अत्याधुनिक डिजिटल स्पीडोमीटर, साईड स्टॅन्ड लावलेले असेल तर गाडी सुरू होत नाही हे सेफ्टी फीचर, गाडी मागे घेण्याचे रिव्हर्स ऑप्शन, मोबाईल चार्जिंग सुविधा, इंडिकेटर्स व हॉर्नसह मोठी आसन व्यवस्था, दिव्यासह मोठी डिकी ही
मॅग्नस -ईएक्स इलेक्ट्रिक स्कूटरची कांही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. ही स्कूटर कुटुंबातील 18 ते 75 वर्षे वयोगटातील सर्वजण वापरू शकत असल्यामुळे तिला ‘फॅमिली स्कूटर’ म्हंटले जाते.
या दुचाकीची बॅटरी डिटॅचेबल असून ती नुसत्या हाताने दुचाकीपासून वेगळी करून घरात नेऊन देखील चार्ज करता येऊ शकते. यासाठी असलेल्या चार्जरमध्ये गाडी किती चार्ज झाली याची टक्केवारी दाखवण्याची सोय आहे. ही स्कूटर अवघी 15 मिनिटे चार्ज केल्यास 5 कि. मी. अंतर धावू शकते असे सांगून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही ‘मॅग्नस -ईएक्स’ इलेक्ट्रिक स्कूटर कर वगळता आमच्या दालनात 1 लाख 5 हजार रुपये किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे यश ऑटो शोरूमचे मालक संजय मोरे यांनी शेवटी स्पष्ट केले.