Saturday, November 23, 2024

/

गल्लीतील लोंबकळणाऱ्या तारांकडे लक्ष द्या: गणेश मंडळांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील दक्षिण भागातील नार्वेकर गल्ली शहापूर आणि इतर परिसरातील रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा वर ओढून सुरक्षित कराव्यात अशी मागणी शहापूर नार्वेकर गल्लीच्या बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन नुकतेच महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

यंदाच्या श्री गणेश उत्सवाचा अवधी 10 दिवसांचा असुन श्री गणेश चतुर्थी सण मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. शहापूर नार्वेकर गल्लीच्या बाल गणेश उत्सव मंडळाला जवळपास 75 वर्षाहून अधिक वर्षांची जुनी परंपरा आहे. शहापूर वार्ड क्र. 23 मधील नार्वेकर गल्ली शहापूर येथे गेल्या कांही वर्षामध्ये स्मार्ट सिटीच्या योजने अंतर्गत नविन इलेक्ट्रिक पोल्स अर्थात नवे पथदीप व त्यासाठी कनेक्शन म्हणून इलेक्ट्रीक बॉक्स रस्त्यावर बसवले आहेत.

नार्वेकर गल्ली ही शहरातील जुन्या गल्ल्यांपैकी एक असल्यामुळे येथील रस्ते अरुंद आहेत. सदर गल्लीत आता नवे पथदीप बसवण्यात आले असले तरी जुने इलेक्ट्रीक खांब व त्यांच्या लोंबकळणाऱ्या हाय होल्टेज विजेच्या तारा गल्लीतील नागरीक आणि गणेश भक्तांसाठी चिंतेची बाब बनलेली आहे.Bal ganesh mandal

तेंव्हा खाली लोंबकळणाऱ्या या तारा व्यवस्थित वर ओढून सुरक्षित कराव्यात. त्याचप्रमाणे येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सवाच्या मंडपाचे विजेचे बिल माफ करावे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी बाल गणेश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह सचिव रितेश बोंगाळे, उपाध्यक्ष सागर देशपांडे व इतर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.