Thursday, December 26, 2024

/

शालेय विद्यार्थ्यांत दडपण चित्रपटाचे प्रमोशन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सामाजिक संदेश देणाऱ्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांत जनजागृती करणाऱ्या मराठी चित्रपट दडपणचे प्रमोशन शाळातून करण्यात आले यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

दडपण सिनेमाच्या टीमला मराठा मंडळ डिग्री व पियू कॉलेज आणि मराठा मंडळ हायस्कूल सेंट्रल हायस्कूल व जिजामाता हायस्कूल येथे प्रमोशनसाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी हायस्कूल व महाविद्यालयीन अशा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या टीमचे खूप जल्लोषी स्वागत केले व चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देऊ असे आश्वासन दिले.

या चित्रपटाचे बेळगाव मधील रसिकांमध्ये प्रचंड आकर्षण वाढत आहे. शनिवारी 5 ऑगष्ट रोजी ग्लोब सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.Dadapan movie pramotion

या चित्रपटाच्या पहिल्या खेळाची सर्व तिकिटे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडस्कर यांनी आरक्षित करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार लेखक दिग्दर्शक संतोष सुतार मुख्य अभिनेते शशिकांत नाईक मुख्य अभिनेत्री निधी राऊळ सहकलाकार जोत्स्ना पाटील व राधिका पाटील यांनी ग्लोब चित्रपट गृहाजवळ जमलेल्या प्रेक्षकांकडेही चित्रपटाची माहिती देऊन प्रमोशन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.