बेळगाव लाईव्ह : न्यायालय आवारात वाहने लावताना शिस्त पाळण्यात यावी. तशी सोय बार असोसिएशन आणि प्रशासनाने करावी, अशी सूचना जिल्हा सत्र मुख्य न्यायाधिशांनी करूनही काही उपयोग झालेला नाही. न्यायालयाच्या पायऱ्यांपर्यंत वाहने थांबवण्यात येत आहेत. यामुळे, न्यायालय आवारात रहदारीची मोठी कोंडीही होत आहे.
न्यायालय आवारात वाहनांची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे, तेथून ये-जा करणेही कठीण बनले आहे. याबाबत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
त्यावेळी न्यायाधिशांनी वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा उपस्थित करून न्यायालय आवारात केवळ वकिल आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्याच वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दोन दिवस त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पण, आता पुन्हा पार्किंगचे तीन-तेरा झाले आहेत.
सोमवारी मंगळवारी न्यायालय आवारात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली न्यायालय इमारतीच्या पायऱ्यांपर्यंत वाहने थांबवण्यात आली होती. समोर वाहने थांबवण्यात येऊ नयेत, यासाठी एक बॅरिकेडही ठेवण्यात आले होते.
पण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी झाल्यामुळे रहदारीची कोंडी झाली होती. त्यामुळे, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला होता. न्यायालय आवारातील या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.