स्वातंत्र्य दिन सोहळ्याप्रसंगी निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा मराठी नगरसेवकांना पोलिसांनी रोखल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली.
निपाणी नगरपालिका कार्यालय आवारात आज सकाळी स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले उपस्थित होत्या.
त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तथापी या कार्यक्रमादरम्यान विनायक वडे आणि संजय सांगावकर या दोघा मराठी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या इमारतीवर जाऊन भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला.
मात्र वेळीच सावध झालेल्या निपाणी पोलिसांनी इमारतीच्या गच्चीवर धाव घेऊन दोन्ही नगरसेवकांना भगवा फडकवण्यापासून परावृत्त केले. यावेळी नगरसेवक माडी आणि सांगावकर यांची पोलिसांशी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे तिरंगा ध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज फडकवता येणार नाही, असे सांगून दोन्ही नगरसेवकांना जबरदस्तीने पालिकेच्या सभागृहात आणून बसविले.
विनायक माडी आणि संजय सांगावकर हे उभयता एनसीपीचा पाठिंबा असलेले नगरसेवक आहेत. निपाणी नगरपालिकेवर भगवा फडकविण्याच्या प्रयत्नाची ही घटना सध्या चर्चेचा विषय झाली आहे.
1991 पासून निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकत आहे पण काही दिवसांपासून काढला आहे त्यामुळे हा प्रयत्न झाला असल्याचे बोलले जात आहे.
निपाणी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या दोन नगरसेवकांनी केला भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न pic.twitter.com/evaMt1plLb
— Belgaumlive (@belgaumlive) August 15, 2023