Saturday, January 4, 2025

/

फोन उसने घेतलेले पैश्याचा तगादा लावल्याने मित्राचा खून

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मित्राचा खून करून शीरसोबत युवक गावात आल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहराबाहेरील बडब्याकुड येथे घडली आहे.

मोबाईल परत द्यावे व उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याने हा खून केल्याचे उघडकीस झाले आहे.

अकबर शब्बीर जमादार ( वय 22) रा हारुगेरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महांतेश सोमनिंग पुजार (रा.बडब्याकुड ) वय 23 असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मयत अकबर व आरोपी महांतेश हे दोघे जिवलग मित्र आहेत. तर ड्रायव्हर असलेला अकबर याने महांतेश यांच्याकडून उसने पैसे घेतला होता. तसेच त्याचा मोबाईल देखील अकबर याने हिसकावून घेतला होता. उसने घेतलेले पैसे व आपला मोबाईल परत देण्याची मागणी महांतेश करीत होता.
यामुळे रागाने महांतेश याने आपल्या मित्रासमवेत जंगलात दारू पाजून अकबर याचा तीक्ष्ण हत्याराने खून केला.

खून केल्यानंतर शीर धडापासून वेगळे केले. तसेच साक्षी व पुरावा नाश करण्यासाठी शीर फेकून दिले आहे. घटनेची माहीती मिळताच शीर नसलेले मृतदेह हारुगेरी सरकारी इस्पितळास हलविण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी इस्पितळासमोर गर्दी करून आक्रोश व्यक्त केला. मध्यरात्री आरोपी महांतेश याला हारुगेरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी हारुगेरी पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.

प्रायव्हेट व्हिडिओच्या भितीने खून : आरोपी महांतेश याचा एका मुलीसोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ मोबाईलमध्ये होता. सदर मोबाईल अकबर याने हिसकावून घेतला असल्याने कुठे तो व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने खून अकबर याचा खून केल्याचे समजते. पण पोलिसांनी याविषयी दुजोरा दिलेला नाही.Murder

यापूर्वी मयत अकबर व आरोपी महांतेश हे दोघे जण चांगले मित्र होते. म्हैस चोरी करून विक्री करीत होते असे सांगितले जात आहे. या दोघांवर हारुगेरी पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा नोंद आहे.

एसपी डॉ संजीव पाटील :गुरुवार रात्री बस्तवाड जंगल परिसरात खून झाल्याची माहिती आली. खून झालेल्या अकबर जमादार याची आई खैरून यांनी फिर्याद दिली आहे.खून झालेल्या अकबर जमादार, आरोपी महांतेश पुजार हे दोघे मित्र असून दोघाच्यात आर्थिक व्यवहार होता. काल जंगल परिसरात घेऊन जाऊन दारू पाजून तिक्ष्ण हत्याराने चिरून खून केला. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.