बेळगाव लाईव्ह : बेळगाव मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी काल सोमवारी पहाटे पहाटे सायकल वरून फेरफटका मारत काम चुकाऊपणा करणाऱ्या सफाई कामगारांना दणका देत नोटीस दिली होती त्यामुळे मनपाची स्वच्छता यंत्रणा एकदम जागी झाली होती.
आयुक्तांनी मंगळवारी शहर दक्षिण भागातील पाहणी केली मंगळवारी सकाळी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नगरसेवक गिरीश धोंगडी,नगरसेवक राजू भातकांडे यांच्या समवेत शहराच्या दक्षिण भागातील कचेरी गल्ली, महात्मा फुले रोड,हुलबत्ते कॉलनी, शास्त्रीनगर, गुड शेड रोड,रेल्वे कंपाऊंड या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामाची पाहणी केली.
सोमवार नंतर मंगळवारी मनपायुक्तांनी मॉर्निंग ग्राउंड केल्याने आता मनपा आयुक्त यांचे काम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून दररोज ते स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे समोर येत आहे त्यामुळे आयुक्तांनी स्वच्छतेबाबत चालविलेल्या धडक दौऱ्याचे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाते.
कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी ग्राउंड वर जाऊन पाहणी करून कोणत्याही कामाला अंमलबजावणी करण्यात आपण तयार आहोत हे देखील मनपा आयुक्तांनी दाखवून दिले आहे. सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या गणेश उत्सवाच्या आयोजन बैठकीत देखील महापालिका आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावच्या स्वच्छतेबाबतीत कॉम्प्रमाईज करणार नसल्याचे म्हटले होते त्याचीच प्रचिती मंगळवारच्या दौऱ्यात देखील पाहायला मिळाली.
महापालिकेच्या आयुक्तांनी प्रभागांमध्ये जाऊन कचऱ्याची विल्हेवाट कशी होत आहे पुरेशीयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सफाई कामगारांची बायोमेट्रिक हजेरी पाहून कामगारांना प्रोत्साहन दिले. कचऱ्याची वाहने काही वॉर्डात जाण्यास विलंब झाला हे लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना सूचना केल्या