Tuesday, January 7, 2025

/

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा; शरद पवार यांना विनंती

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या याचिके संदर्भात महाराष्ट्र शासनाने उच्च अधिकार समितीची बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे.शनिवारी कोल्हापूर मुक्कामी खानापूर तालुका समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि बेळगावचे रामचंद्र मोदगेकर यांच्या नेतृत्वाखालील भेटलेल्या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे गेल्या 2017 पासून आतापर्यंत या दाव्याची एकदाही सुनावणी झाली नाही. तेंव्हा याप्रकरणी लक्ष घालून तिर्‍हाईत राज्यांचे न्यायाधीश नियुक्त करून ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी. तसेच उच्च अधिकार समितीची बैठक बोलावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करवी या दाव्याला गती द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आली आहे.

खानापूर, बेळगांव आणि निप्पाणी घटक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यावर आलेले देशाचे नेते माजी कृषी व संरक्षणमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदरावजी पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून आजपर्यंत प्रलंबित तर आहेच, शिवाय 2017 पासून आतापर्यंत एकदाही या दाव्याची सुनावणीही झाली नाही.Border issue

तीन खंडपीठांच्या न्यायालयात एकदा कर्नाटकाचे न्यायाधीश उपस्थित असतात तर एकदा महाराष्ट्राचे, हे कारण देत आजपर्यंत तारखा पडत आलेल्या आहेत. त्यामुळे यापुढील दोन्ही राज्यांच्या खंडपीठा ऐवजी तिर्‍हाईत राज्यांचे न्यायाधीश नियुक्त करून ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न त्वरीत निकालात काढावा, अशी विनंती करण्यात आली.

गेली 66 वर्षे सीमाभागातील जनता कानडीकरणाच्या वरवंट्याखाली भरडली जात आहे. त्यांची याच्यातून मुक्तता करण्यासाठी आपणच सीमाभागाचे आधारस्तंभ आहात. तरी आपण लवकरात लवकर यांमध्ये लक्ष्य घालून उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या करवी या दाव्याला गती द्यावी अशी विनंती सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.Markandey

यांवर शरद पवार यांनी सीमावासीयांना आश्वस्त करताना मुंबईला जाताच तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची त्वरित बैठक घेऊन वेगाने हालचाली करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले. शिष्टमंडळामध्ये खानापूर समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजीत पाटील, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, रविंद्र शिंदे, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य कृष्णा मल्लाप्पा कुंभार, उपाध्यक्ष कृष्णा मन्नोळकर, बेळगांवचे माजी जि. पं. सदस्य मोदगेकर तसेच निप्पाणी भागातील म. ए. समिती सदस्यांचा समावेश होता.Potdar election

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.