बेळगाव लाईव्ह :पुणे मुंबई नंतर बेळगावात सर्वात मोठा गणेश उत्सव बेळगावात साजरा केला जातो हाच गणेश उत्सव काही दिवसावर आला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी कशी असायला हवी ? उत्सवा दरम्यान प्रशासन कोण कोणती उपाययोजना करणार आहे आणि गणेश महामंडळांच्या कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे आहेत यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश महामंडळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
सोमवारी 7 ऑगष्ट रोजी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखालीच सदर बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्हा प्रशासन पोलीस महापालिका आरोग्य, वनखाते हेस्कॉम अग्निशामक दल, सार्वजनिक बांधकाम यासह मध्यवर्ती गणेश महामंडळ आणि लोकमान्य गणेश महामंडळाचे पदाधिकारी गणेश मूर्तिकार ,गणेश मंडळे आणि डॉल्बी असोसिएशन पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. मनपा प्रशासनाने सर्वांना नोटीस देत बैठकीची कल्पना दिली आहे.
बैठकीत विशेषता हेस्कॉम कडून गणेश मंडळांना वीज बिलात मिळणारी सवलत याशिवाय मंडळांना दिली जाणारी परवानगी पावसाने खराब झालेले रस्ते आणि डॉल्बीच्या विषयावर चर्चा व्हायची शक्यता आहे कारण दोन्ही महा मंडळांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांची निवेदने दिली आहेत.
श्री गणेशोत्सव काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक सामग्री व उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटी सामग्रीची दुकाने तसेच हॉटेल व्यवसायिकांना वेळेचे बंधन शिथिल करून देण्यात यावीत जेणेकरून सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही. विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महिला पोलीस बंदोबस्त ठेवून गर्दीच्या ठिकाणी महिला व बालकांना सहकार्य करावे.महिलांसाठी तात्पुरत्या त्यावेळी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जावी अश्या मागण्या देखील केल्या जाणार आहेत.
यंदाच्या सार्वजनिक गणेश उत्सव आयोजन संदर्भात पालक मंत्री सतीश जारकीहोळी घेणार महत्वाची बैठक
सोमवारी 7 रोजी मनपा सभागृहात बैठकीचे आयोजन pic.twitter.com/THLOiyWLDO— Belgaumlive (@belgaumlive) August 6, 2023