बेळगाव लाईव्ह: शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या घरात समाधानाचा दिवा पेटतो. मातीशी झुंज देणारा शेतकरी ज्यावेळी बाजारात पराभूत होतो त्यावेळी त्याच्या पाठीवरची ठिगळं झाकायला आभाळही पुरं पडत नाही ही शेतकऱ्याची व्यथा आहे.
शेतकरी टिकायचा आणि शेतकरी जगायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला उत्तम भाव मिळायला हवा यासाठी शेतकऱ्याचे हित जपणारी लोक बाजारात अधिक संख्येने असायला हवी.
साखर कारखाना म्हणजे ही गोड साखरेची कडू कहाणी झालेली आहे कारण पेरा पेराने वाढलेला मातीतला ऊस, साखर कारखान्याच्या चारकात जातो त्यावेळी शेतकऱ्याला लाभ देण्यापेक्षा पिळवणूक करणाऱ्यांचा मतलब साधला जातो याला छेद देण्यासाठी जे मनानं परंपरेने शेतकरी आहेत त्यांच्याच ताब्यात साखर कारखान्याची सूत्रे गेली पाहिजेत त्यावेळीच शेतकऱ्याच्या घरात खरी दिवाळी साजरी होईल.
याच विचाराने प्रेरित होऊन मातीशी नाते सांगणारे शेतकरी बचाव पॅनेल मार्कंडेय साखर कारखान्याच्या रिंगणात उतरले आहे. रान मातीचा धुरळा अंगावर वागवण्याऱ्या त्या शेतकऱ्यांच्या गटाला विजयाचा गुलाल लागलाच पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी शेतकरी बचाव पॅनल चे उमेदवार आर आय पाटील आर के पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांनी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांची भेट घेतली आणि आगामी निवडणुकीसाठी पाठिंबाही मिळवला.
यावेळी आर के पाटील,सुरेश अगसगेकर मल्लाप्पा पाटील, अंबोळकर आदी उपस्थित होते.
तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आज सकाळी कडोली, कंग्राळी, काकती, होनगा, शाहुनगर, वडगाव, मजगाव, नंदिहळ्ळी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी कारखाना भांडवलदारांना लीजवर देऊन शेतकर्यांचा कारखान्यावरचा हक्क संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांना रोख लावण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. शेतकर्यांचा कारखाना शेतकर्यांकडेच राहिला पाहिजे, अशी आमची भुमिका आहे. त्यामुळे मतदारांनी शेतकरी बचाव पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.