Monday, November 18, 2024

/

महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी कार्यकर्ते निर्दोष

 belgaum

उचगांव येथे गेल्या 2014 मध्ये “महाराष्ट्र राज्य उचगांव” हा फलक उभारल्या प्रकरणी आरोप सिद्ध न झाल्यामुळे बेळगाव चतुर्थ जीएमएफसी न्यायालयाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व 8 कार्यकर्त्यांची आज मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या कार्यकर्त्यांची नावे मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण आप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम आणि राजेंद्र वसंत देसाई अशी आहेत.

येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” हा फलक हटविल्यानंतर सीमाभागात अनेक गावांमध्ये तसे फलक उभारण्यात आले होते. उचगांव येथेही 2014 मध्ये “महाराष्ट्र राज्य उचगांव” हा फलक बस थांब्याच्या ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन फलक हटविला.

तसेच याप्रकरणी कन्नड व मराठी भाषिकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करून शांतता भंग केल्याचा आरोप ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 8 कार्यकर्त्यांवर काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. उचगांव ग्रामपंचायत सेक्रेटरी सद्याप्पा बसाप्पा तारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपरोक्त 8 जणांवर भादवि कलम 143, 147, 153 (अ) सह कलम 149 आणि कलम 3 केओपीडी ॲक्ट 1951 व 1981 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.Court bgm mes

पोलीस अधिकारी आर. टी. लखनगौडर यांनी घटनेचा तपास करून आरोप पत्र दाखल केले होते. तथापि बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयासमोर 8 जणांची साक्ष नोंदवून देखील सदर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा शाबित होऊ शकला नाही. युक्तिवादा दरम्यान “महाराष्ट्र राज्य उचगांव” हा फलकच काकती पोलिसांनी न्यायालयात हजर केला नसल्याची बाब ॲड. महेश बिर्जे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावेळी फलकाचे फोटो पोलिसांनी हजर केले. तथापि न्यायालयाने ते ग्राह्य धरले नाहीत. अखेर वरील सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर व ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.