बेळगाव लाईव्ह: “राज्यात बेळगाव शहराचा विकास वेगाने होत आहे. उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होत आहे.पाणी वीज यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले
बेळगाव शहरा जवळील मच्छे वीज वितरण केंद्राच्या आवारात सोमवारी (7 ऑगस्ट) 260 कोटी रुपये खर्चून 220 के.व्ही. वीज वितरण केंद्र आणि अनेक वीज पारेषण लाईनच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक कामे करायची आहेत. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास बेळगावचा सर्वांगीण विकास शक्य होईल. याबाबत शासन सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दर्जेदार वीज पुरवठ्याची सुविधा:
या भागातील उद्योजकांच्या अनेक दिवसांच्या मागणीनुसार 220 के.व्ही. नवीन वीज केंद्र बांधले जात आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्योगांना वीज पुरवठा करण्यात यावा उद्योगांना दर्जेदार आणि सतत वीजपुरवठा आवश्यक असल्याने हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे असेही जारकीहोळी म्हणाले.
दक्षिणचे आमदार पाटील उतरचे आमदार सेठ जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.