कर्नाटक लाॅ सोसायटीचे राजा लखमगौडा लॉ कॉलेज यंदा आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून कॉलेजचे 5 माजी विद्यार्थी जे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्यांचा सत्कार समारंभ येत्या शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटकला सोसायटीचे सेक्रेटरी ॲड. एस. व्ही. गणाचारी यांनी दिली.
शहरातील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणाऱ्या राजा लखमगौडा लॉ (आर. एल.) कॉलेजच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार हा कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षाचा एक भाग तर असणाराच आहे, शिवाय सध्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलांना प्रोत्साहित करणे हा देखील या सत्कार समारंभाचा मुख्य उद्देश आहे.
कर्नाटक लाॅ सोसायटीचे अध्यक्ष ॲड. आनंद मंडगी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश प्रसन्ना बी. वरले उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रदीप सावकार, सेक्रेटरी माझ्यासह विवेक कुलकर्णी, लॉ कॉलेज चेअरमन एम. आर. कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत, असे ॲड. गणाचारी यांनी पुढे सांगितले.
सदर सत्कार समारंभात कारण ही सोसायटीचे अध्यक्ष ॲड. आनंद मंडगी यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे उच्च न्यायाधीश प्रसन्ना वरले यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठांचे न्यायाधीश पद भूषवीत असलेल्या न्यायाधीश सचिन शंकर मगदूम, न्यायाधीश रवी वेंकप्पा होसमणी, न्यायाधीश के. एस. हेमलेखा, न्यायाधीश अनिल भीमसेन कट्टी आणि न्यायाधीश रामचंद्र डी. हुद्दार यांचा प्रमुख पाहुणे उच्च न्यायाधीश वरले यांच्या हस्ते सत्कार होईल.
याप्रसंगी कर्नाटकला लाॅ सोसायटीच्या सदस्यांसह बेळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व कार्यरत वकील, विविध न्यायालयाचे न्यायाधीश, निमंत्रित आणि कॉलेजचे विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ही ॲड. एस. व्ही. गणाचार्य यांनी दिली. पत्रकार परिषदेस कर्नाटकला लाॅ सोसायटीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.