Saturday, January 18, 2025

/

जितो बेळगावतर्फे 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर

 belgaum

देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन, आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट बेळगावच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगाव शाखेतर्फे येत्या मंगळवार दि 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जीतो बेळगावचे चेअरमन मुकेश पोरवाल यांनी दिली.

शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महावीर भवन सभागृहात होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिरामध्ये केएलई रक्तपेढी, बीम्स रक्तपेढी, महावीर रक्तपेढी आणि बेळगाव रक्तपेढी यांचाही सहभाग असणार आहे. द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांचा देखील या रक्तदान शिबिराला पाठिंबा असणार आहे.

शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना कृतज्ञते दाखल द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून एक वर्षासाठी वैध असणारी 1 लाख रुपये किंमतीची जनता पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी दिली जाणार आहे. जीतोच्या या भव्य रक्तदान शिबिर उपक्रमाचे निमंत्रक विजयकुमार पाटील हे असणार असून जितो चेअरमन मुकेश पोरवाल, बेळगावचे डेप्युटी ड्रग कंट्रोलर राजशेखर मल्ली आणि हेल्थ केअरचे निमंत्रक हर्षवर्धन इंचल यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर भरविले जाणार आहे.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) देशभरात 69 हून अधिक शाखा असून 16 हून अधिक आंतरराष्ट्रीय शाखा आहेत. ज्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे जितोचे जगभरात 16000 हून अधिक सदस्य आहेत सेवा, ज्ञान आणि आर्थिक सक्षमीकरण ही जीतोची उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने जितो संपूर्ण भारतात विविध प्रकल्प राबवत असते.Jito

जीतोच्या बेळगाव शाखेची स्थापना 13 वर्षांपूर्वी झाली असून प्रारंभापासूनच ही शाखा सामाजिक बांधिलकी जपत जनहितार्थ कार्य करत असल्याचे मुकेश पोरवाल यांनी शेवटी सांगितले.

यावेळी मानवी रक्त आणि रक्तदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. त्याचप्रमाणे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी रक्तदान शिबिराचे निमंत्रक विजयकुमार पाटील 9632245884 किंवा हर्षवर्धन 9844441008 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेस जीतोचे मुख्य सचिव नितीन पोरवाल हर्षवर्धन इंचल विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.