बेळगाव लाईव्ह :समाजामधील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या मान्यवरांना शोधून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी स्पर्धा, नवरत्न सत्कार असे निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत सन 2002 पासून श्री गणेश फेस्टिवल बेळगावची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. असे कार्यक्रम यापुढेही आम्ही राबविणार आहोत.
या गणेश फेस्टिवल बेळगाव मुळे आज पर्यंत अनेक उपेक्षितांचा त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सत्कार झाला व त्यांना व्यासपीठ मिळाले त्यानंतर त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.
अनेक नामवंत कलाकारांच्या कारकीर्दीची सुरुवात ही गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावरूनच झाली आहे. अनेक रसिक मंत्रमुग्ध झाले. अनेक महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. कोणताही स्वार्थ न बाळगता, कोणताही दिखावा न करता समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचा अभिमान आम्हाला आहे.
या सर्वच स्तरांवर समृद्ध विचारांनी सुरू असलेल्या या उत्सवात आपणा सर्वांची साथ हवी. यंदाचा श्री गणेश फेस्टिवल दिनांक 02/09/2023 पासून 06/09/2023 पर्यंत साजरा होणार आहे यामध्ये,
शनिवार दिनांक 02/09/2023 रोजी
“रांगोळी स्पर्धा”-फ्री हॅन्ड
रविवार दिनांक 03/09/2023 रोजी
“पाककला स्पर्धा”.
1) हरभरा डाळीचे गोड पदार्थ
2) हरभरा डाळीचे तिखट पदार्थ
सोमवार दिनांक 04/09/2023 रोजी
“एकपात्री नाट्य स्पर्धा”- मोबाईल/सोशल मीडियाचे दुष्परिणाम.
स्थळ: या सर्व स्पर्धा ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळा, शास्त्रीनगर, बेळगाव येथे दु. 2.00 वाजता घेण्यात येतील. या स्पर्धांकरिता कोणतेही प्रवेश शुल्क नाही. बक्षीस वितरण स्पर्धा संपता क्षणी त्याच ठिकाणी होईल.
या स्पर्धा खास करून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता हा संदेश जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावा.
मंगळवार दिनांक 05/09/2023 रोजी
श्री माधव कुंटे प्रस्तुत “वऱ्हाड निघालय लंडनला” हा एकपात्री प्रयोग.
स्थळ: ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, शास्त्रीनगर, बेळगाव येथे सायंकाळी 04.00 वाजता.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.
बुधवार दिनांक 06/09/2023 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
“नवरत्न सत्कार”
स्थळ: श्री माता सोसायटी सभागृह न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथे सायंकाळी 04.00 वाजता.
अधिक माहिती करिता संपर्क-
9449075040, 9964832375, 7619448164, 0831-2405121, 2431357, 2468280.