Tuesday, December 3, 2024

/

प्रतापला मिळाले बिलाल जमातचे बळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह: शिवाजी नगर बेळगावचा बॉडी बिल्डर प्रताप कालकूंद्रीकर याची नेपाळ मध्ये होणाऱ्या आशियाई आणि दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शिवाजीनगर वीरभद्र नगर प्रभाग 13 चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन दिले आहे.वीरभद्र नगर येथील हजरत बिलाल जमात आणि यंग कमिटीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फारूख मकानदार आदी उपस्थित होते

समाजाच्या घटकातून ज्यावेळी क्रीडापटू निर्माण होतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती साधण्यासाठी अनेक साधनांची गरज असते बेळगाव सारख्या छोट्या शहरातील खेळाडूंची आर्थिक स्थिती मजबूत असेलच असे सांगता येत नाही त्यामुळे नेहमीच बेळगावच्या जनतेने अश्या खेळाडूंना आर्थिक मदत देत प्रोत्साहन दिले आहे त्यातून अनेक क्रीडा पटूनी देश पातळीवर चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.

वीरभद्र नगर नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी बेळगावच्या या परंपरेचे नाते कायम ठेवत बॉडी बिल्डर प्रताप कालकुंद्रीकर यांना बळ देण्याचे काम केले आहे.केतकी पाटील आणि प्रताप कालकुंद्री कर या बेळगावच्या दोघांची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी झाली आहे.Pratap kalkundrikar

बेळगावच्या खेळाडूंचा दर्जा सुधारण्यासाठी अश्या सामाजिक संस्थांनी बेळगावात खेळाडूंना सरावासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करावेत त्याचं बरोबर उद्योगपतीनी काही खेळाडू दतक क्रीडापटुंच्या आयुष्यातील अस्थिरता नष्ट केली पाहिजेत हे बेळगावातील जनतेला सहज शक्य आहे त्यासाठी रचनात्मक कार्य करण्याची गरज आहे बेळगावचे क्रीडा विश्व पहिल्या पासूनच आघाडीवर आहे. त्याला अधिक सदृढ बनवण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबवणे गरजचे आहे.

पालक मंत्र्यांच्या हस्ते शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार

दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या तसेच आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या शरीरसौष्ठपटूंचा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

मालदीव येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू व्यंकटेश ताशिलदार याने कांस्य पदक मिळविले आहे. त्याचप्रमाणे प्रवीण कणबरकर याला चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर शरीरसौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर व केतकी पाटील यांची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई आणि दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल सदर सर्व शरीरसौष्ठवपटूंचा क्रीडाप्रेमी असलेले बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, सेक्रेटरी एम. गंगाधर सुनील राऊत आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.