बेळगाव लाईव्ह :माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नवीन बॉम्ब टाकत माझ्याकडे देखील एक पेन ड्राईव्ह असल्याचं म्हटलंय.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेकांकडे पेन ड्राईव्ह असतील पण माझ्याकडे देखील एक पेन ड्राईव्ह आहे योग्य ती वेळ आणि योग्य ठिकाणी दाखवतो असेही त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे लक्ष्मण सवदी यांनी पेन ड्राइव बाबत वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
तुमच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्ह भाजपचे आहे की जीडीएसचे याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की ज्यावेळी मी पेन ड्राईव्ह दाखवीन त्यावेळी तुम्हाला समजेल की ते कोणत्या पक्षाचे आहे. तुम्ही ते पेन ड्राईव्ह कधी दाखवणार आहात या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वेळ अजून आली नाही ‘त्या वेळेची वाट बघतोय असाही त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यात या अगोदर सी डी चे राजकारण सुरू झाले होते ते संपते न संपते आता पेन ड्राईव्हचे राजकारण सुरू होते का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.