गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हेस्कॉमला निवेदन सादर

0
8
Ganesh maha mandal
 belgaum

आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन आज शनिवारी हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले.

हेस्कॉमतर्फे नेहरूनगर येथील हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आज शनिवारी आयोजित विद्युत अदालतीमध्ये उपरोक्त निवेदन सादर केले गेले. निवेदनाचा स्वीकार करून हेस्कॉम अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदन सादर करतेवेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,सागर पाटील,आनंद आपटेकर तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.Ganesh maha mandal

 belgaum

यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गणेशोत्सव काळात वीज पुरवठा आणि विज बिल यासंदर्भात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती देऊन त्यांचे निवारण करण्याची विनंती केली. तसेच काही स्वागतार्ह सूचना देखील केल्या. शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळं ही रजिस्टर्ड अर्थात नोंदणीकृत आहेत. मात्र गेल्या वर्षी गणेशोत्सव काळातील मंडपाच्या विद्युत रोषणाईच्या विजेचे बिल मंडळाच्या नावावर न काढता, मंडळाच्या अध्यक्षांच्या नावे त्यांच्या घरच्या वीज बिलात समाविष्ट केले गेले होते.

सदर प्रकार मनस्तापदायक असल्यामुळे आता मंडळाचा अध्यक्ष होण्यास कोणी धजावेनासा झाला आहे. तेंव्हा कृपया सार्वजनिक गणेश मंडपाच्या विद्युत रोषणाईचे विजेचे बिल अध्यक्षाच्या नावे न काढता संबंधित मंडळाच्या नावे स्वतंत्र काढले जावे, अशी विनंती हेस्कॉम अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेप्रसंगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.