बेळगाव लाईव्ह: राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे.
बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर, माळ मारुती पोलीस स्थानकात जे एम कालिमिरची,कॅम्प पोलीस स्थानकात अल्ताफ मुल्ला, शहरातील महिला पोलीस स्थानकात सुलेमान ताशिलदार, ए पी एम सी पोलीस स्थानकात विश्वनाथ कब्बुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिवाय मारीहाळ पोलीस निरीक्षकांना बदली हुक्केरी पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे तर निपणीचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांची बदली बंगळुरूला झाली आहे.
चिकोडी पोलीस निरीक्षक पदी विश्वनाथ चौगुले तर बेळगाव शहर स्पेशल ब्रांच पोलीस निरीक्षक म्हणून चननकेशव टेंग्रीकर यांची नियुक्तीचा आदेश आला आहे.
नंदगड पोलीस निरीक्षक पदी एस सी पाटील यांची नियुक्ती झाली आहे लवकरच पोलीस निरीक्षकांची बदलीची दुसरी यादी देखील लवकरच येणार आहे.
अल्ताफ मुल्ला यांनी काकती पोलीस स्थानकात विश्वनाथ कब्बुरे यांनी बेळगाव ग्रामीण तर जे एम कालीमिरची यांनी ए पी एम सी आणि माळ मारुती पोलीस तर चननकेशव टिंग्रीकर यांनी माळ मारुती पोलीस स्थानकात या अगोदर सेवा बजावली आहे त्यामुळे वरील पोलीस अधिकाऱ्यांना या अगोदर बेळगावात काम करण्याचा अनुभव आहे.