बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर ग्रामस्थांवर अमानुष मारहाण करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी मंगळवारी (दि. 22) झाली. ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
2014 मध्ये येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला. या प्रकाराला ग्रामस्थांनी शांततेत विरोध केला. पण, पोलिसांनी घराघरात घुसून लोकांना मारहाण केली. त्यामध्ये शेकडो लोक जखमी झाले होते.
या अमानुष कृत्याची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली. पण, पोलिसांनी ग्रामस्थांवरच खटला दाखल केला. या खटल्यात 26 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होती.
न्यायाधिशांनी ही सुनावणी लांबणीवर टाकली. पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील काम पाहात आहेत.