बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यावर सदोष कर्णकश सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी वाहन चालकांविरुद्ध मोहिम उघडताना बेळगाव रहदारी पोलिसांनी काल एकूण 16 दुचाकी चालकांवर कारवाई करत त्यांची वाहने गुन्हा नोंदवून जप्त केली आहेत.
बेळगाव रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या नेतृत्वाखाली रहदारी पोलिसांनी शहरातील क्लब रोड आणि गांधी सर्कलसह विविध ठिकाणी सदोष सायलेन्सर असणाऱ्या दुचाकी चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई केली.
काल रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत रहदारी पोलिसांनी एकूण 16 दुचाकी वाहन चालकांवर कलम 190 (2) मोटार कायद्या अंतर्गत कायदेशीर क्रम घेतले आहेत. संबंधित वाहने जप्त करण्याबरोबरच पोलिसांनी संबंधित वाहन चालकांना चांगली समज दिली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी वाहनांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 1) केए -22 /एचके -0937, 2) केए -22 /5263, 3) केए -22 /ईपी -2505, 4) एमएच 09 /इक्यू 1623, 5) जीए -05 /एन -3205, 6) केए -22 /एचइ -5300, 7) केए -22 /एचडी -3399, 8) केए -22 /इक्यू 2530,
9) केए -22 /एचइ 2595 (स्कुटी), 10) केए -22 /एचई-8271, 11) एमएच -14 /एचएन -9033, 12) केए -22 /एचएफ -4439, 13) केए -02 /एचपी 0001, 14) केए -22 /एचडी -3242, 15) केए -03 /जेडब्लू -2853 आणि 16) एक नंबर प्लेट नसलेली बुलेट.