Sunday, January 5, 2025

/

एनसीसी भरतीसाठी विद्यार्थी -विद्यार्थिनींना आवाहन

 belgaum

जाधवनगर, बेळगाव येथील 8 कर्नाटका एअर स्कॉड्रन एनसीसीतर्फे येत्या रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शहरातील अनुदानित शिक्षण संस्था /महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी सीनियर /ज्युनियर डिव्हिजन विंग एनसीसी कॅडेट भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील सर्व सरकारी, अनुदानित शिक्षण संस्था /महाविद्यालयातील पदवी पूर्व (पीयुसी) प्रथम वर्ष आणि पदवी (डिग्री) प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी -विद्यार्थिनी या भरतीसाठी पात्र असतील.

तसेच पीयूसी प्रथम वर्षात शिकणाऱ्या कॅडेटच्या महाविद्यालयात तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असावयास हवा.

भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता चांचणीसाठी स्पोर्ट्स शूज घालून यावेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी एअरविंग ऑफिस जाधवनगर, बेळगाव येथे सार्जंट रामूराम बिश्नोई 7057820937 अथवा कार्यालयाचे अधीक्षक सी. सुभाषचंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-मेल: [email protected] असा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.