Tuesday, January 28, 2025

/

दिल्ली पुणे विमानसेवेची कडाडी यांची घोषणा

 belgaum

बेळगाव लाईव्ह: गेल्या कित्येक महिन्यापासून बंद झालेल्या बेळगाव दिल्ली आणि बेळगाव पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार अशी माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे.

कडाडी यांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून सदर विमानसेवा बाबत माहिती दिली आहे.

आगामी 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअर कंपनीची बेळगाव पुणे ही दररोज विमानसेवा तर पुणे बेळगाव ही इंडीगोची विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

 belgaum

बेळगाव जिल्ह्याचा स्थानिक खासदार म्हणून मी इंडिगो आणि स्टार एअर या दोन्ही कंपन्यांचे बेळगाव दिल्ली आणि बेळगाव पुणे अशा दोन विमानसेवा सुरू केल्याबद्दल आभार मानतो असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केला आहे.

हा विकास निःसंशयपणे कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि आपल्या बेळगावला मोठ्या प्रमाणात सुविधा देईल असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार कडाडी यांनी या विमान सेवांची घोषणा केली असली तरी अद्याप दोन्ही एअरलाइन्सच्या वेळापत्रकात अजून याची माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या कित्येक महिन्यापासून बेळगाव ते दिल्ली विमान सेवा यशस्वीरित्या सुरू होती मात्र स्पाइस जेट विमान कंपनीने अचानक ती बंद केली होती आता इंडिगो ने बेळगाव दिल्ली ही विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बेळगाव होऊन दिल्लीला किंवा उत्तर भारतात प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अलाएन्स एअर ची पुणे बेळगाव बंद झाल्यावर आता स्टार एअर आणि इंडिगो ची सेवा मिळणार आहे.

बेळगाव दिल्ली या विमानसेवा साठी बेळगाव कोल्हापूर विजापूर बागलकोट सांगली आदी भागातील प्रवाश्यांना याचा लाभ होणार आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.