बेळगाव लाईव्ह :बेळगाव-दिल्ली विमानसेवेसाठी बुकिंग सुरू गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बेळगाव-दिल्ली विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.या विमानसेवेसाठी इंडिगो विमान कंपनीने बुकींग सुरू केले आहे.
विमान नवी दिल्लीहून दुपारी 3.45 वाजता निघेल आणि बेळगावला 6.05 वाजता उतरेल. 2 तास 20 मिनिटे प्रवासाचा वेळ असून बेळगावहून संध्याकाळी 6.35 वाजता निघून रात्री 9 वाजता दिल्लीला पोहोचेल.
दिल्ली – बेळगावसाठी 5294 रूपये आणि बेळगाव-दिल्लीसाठी 4719 रूपये तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे.
सांबरा विमानतळावरून बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा होती. प्रवाशांची संख्याही पुरेशी होती. पण अचानक ही सेवा रद्द करून हुबळीहून सुरू झाली.
आता पुन्हा बेळगावहून विमानसेवा सुरू होत आहे. बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी प्रयत्न केले त्यामुळेच ही सेवा पुन्हा बहाल झाली आहे.
स्पाइस जेटची बेळगाव दिल्ली विमानसेवा ही सकाळीच्या वेळेत होती मात्र आता इंडिगो ची विमान सेवा ही सायंकाळी च्या वेळी असणार आहे. एकीकडे हुबळी दिल्ली विमानसेवा दुपारी च्या वेळेस आहे त्यामुळे बेळगाव सायंकाळच्या वेळेच्या सेवेला प्रतिसाद मिळू शकतो.