बेळगाव लाईव्ह :दरवर्षी बसवण कुडची येथील श्री कलमेश्वर, श्री बसवाणा, व श्री ब्रहदेवाच्या वार्षिक यात्रोत्सवात इंगळयासाठी काकती डोंगरातून वृक्षतोड करून लाकुन आणले जाते त्यासाठी जंगलातील झाडे अबाधित राहावी साठी बसवण कुडची ग्रामस्थांनी थेट काकतीच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. मागील वर्षीपासून देवस्थान पंच कमिटीने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाडे लावण्याचा उपक्रम चालू केला आहे.
कोणत्याही गावच्या यात्रेत आगीसाठी इंगळ्यासाठी लाकूड जाळले जाते या शिवाय होळीच्या निमित्ताने होळी जाळण्यासाठी देखील अनेक ठिकाणीची वृक्षतोड होत असते एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावच्या वतीने वृक्ष लागवड किंवा वृक्षारोपण करणे गरजेचे बनले आहे बसवन कुडची गावाने जंगलात झाडे लावण्याचा आदर्शवत उपक्रम राबवला आहे.
गावकऱ्या कडून काकतीच्या डोंगरात झाडे लावण्याच्या उपक्रमाचे बेळगाव वन खात्याने देखील कौतुक केले आहे.रविवारी सकाळी सुरुवातीला पंच कमिटी आणी गावकऱ्यांच्या हस्ते मार्कंडेय नदीचे गंगापूजन करण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांनी अनेक ठिकाणीं खड्डे खोदून जांभळी आणि जांभूळची शेकडो झाडे लावली.
यावेळी गावचे नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत केवळ झाडे लावून उपयोग होणार नसून या झाडांचे जतन केले पाहिजे असे नमूद करत झाडे लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. वन संरक्षण करण्याच्या हेतूने झाडं झालेल्या डोंगर किंवा आपल्या परिसरात एक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान 5 झाडे तरी लावावीत तरचं आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे त्यांनी म्हटले.
समाजसेवक परशराम बेडका,संजू बडिगेर, नामदेव जैनोजी, नामदेव मुतगेकर, संतोष चौगुले, माणिक इटगी, भरमू वंडरोटी,विद्या वंडरोटी,मानाजी चौगुले, गावातील पंच कमिटी, गावकरी उपस्थित होते. वृक्षारोपणाला वन्य विभागाचे ही चांगले सहकार्य लाभले.