Thursday, January 9, 2025

/

बेळगाव स्मार्ट सिटी लि.ला मिळाला ‘हा’ राष्ट्रीय पुरस्कार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी पुरस्कार स्पर्धेमध्ये (आयएसएसी -2022) बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने ‘उत्कृष्ट क्षेत्रीय स्मार्ट सिटी’ पुरस्कार पटकावला आहे. सदर पुरस्कार इंदोर येथे येत्या 27 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

स्मार्ट उपायांच्या अंमलबजावणीद्वारे मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासह नागरिकांना सभ्य गुणवत्ता पूर्ण जीवन उपलब्ध करून देणे या उद्देशाने गेल्या 25 जून 2015 रोजी देशात स्मार्ट सिटीज मिशन अर्थात स्मार्ट सिटी मोहीम सुरू झाली.

देशातील शहरी विकासामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठीची ही परिवर्तनाची मोहीम आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत देशातील नियोजित प्रकल्पांपैकी 1,10,635 कोटी रुपये खर्चाचे 6,041 (76 टक्के) प्रकल्प आत्तापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित 60,095 कोटी रुपये खर्चाचे 1,894 प्रकल्प येत्या 30 जून 2024 पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. देशातील 100 स्मार्ट सिटी अर्थात स्मार्ट शहरांमध्ये ऊर्जा, गमनशीलता (मोबिलिटी), पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, दोलायामान सार्वजनिक जागा, सामाजिक पायाभूत सुविधा, स्मार्ट प्रशासन आदी विविध क्षेत्रातील प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

उदाहरणादाखल देशात स्मार्ट मोबिलिटीचे 24,047 कोटी रुपये खर्चाचे 1,174 प्रकल्प पूर्ण झाले असून अन्य 15,940 कोटी रुपये खर्चाचे 434 प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. स्मार्ट ऊर्जेच्या बाबतीत 573 प्रकल्प पूर्ण झाले असून 94 प्रकल्पांचे काम सुरू आहे. पाणी पुरवठा, सफाई आणि स्वच्छता (वॉश) या संदर्भातील 34,751 कोटी रुपये खर्चाचे 1162 प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून 18,716 कोटी रुपये खर्चाच्या 333 प्रकल्पांचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी मिशन मधील 100 शहरांनी सार्वजनिक जागांच्या विकासाचे 6,403 कोटी रुपये खर्चाचे 1,063 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले असून 5,470 कोटी रुपये खर्चाच्या आणखी 260 प्रकल्पांचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त 8,228 कोटी रुपये खर्चाच्या 180 सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून तशा आणखी 27 प्रकल्पांचे काम सुरू आहे. बाजारपेठ पुनर्विकास यासारख्या आर्थिक पायाभूत सुविधांशी संबंधित 652 प्रकल्प पूर्ण झाले असून 267 प्रकल्पांचे काम सुरू आहे. सामाजिक पायाभूत सुविधा क्षेत्रातील 679 प्रकल्प पूर्ण झाले असून 153 प्रकल्पांचे काम अद्याप सुरू आहे.Bscl award

प्रकल्प पुरस्कार, नवीनता पुरस्कार, राष्ट्रीय /क्षेत्रीय शहर पुरस्कार, राज्य पुरस्कार अशा विविध 6 श्रेणींमधील आयएसएससी -2022 साठी देशातील 80 पात्र स्मार्ट शहरांकडून 845 नामांकन आली असून एकूण पाच टप्प्यात त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील छाननीमध्ये 845 प्रस्तावांपैकी 50 टक्के म्हणजे 423 प्रस्ताव पुढील टप्प्यात पोहोचले. दुसऱ्या टप्प्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्सच्या परीक्षकांनी प्रत्येक श्रेणीतील आघाडीच्या 12 प्रस्तावांची निवड करण्यात आली. अखेर एकूण 845 अर्जांमधून पाच पुरस्कार श्रेणी अंतर्गत 66 अंतिम विजेत्यांची निवड केली गेली.

यामध्ये 35 प्रकल्प पुरस्कार विजेते, 6 नवीनता पुरस्कार विजेते, 13 राष्ट्रीय /क्षेत्रीय उत्कृष्ट स्मार्ट शहर पुरस्कार विजेते, 5 उत्कृष्ट राज्य /केंद्रशासित प्रदेश पुरस्कार विजेते आणि 7 भागीदारी पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.

त्यापैकी क्षत्रिय उत्कृष्ट स्मार्ट सिटी शहर पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने (बीएससीएल) स्थान मिळविले आहे. विविध श्रेणीतील अंतिम 66 पुरस्कार विजेत्यांना येत्या 27 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश येथील इंदोर येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ‘आयएसएसी -2022’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.Markandey

Potdar election

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.