Friday, October 18, 2024

/

बेळगावच्या उद्योजकाला पुरस्कार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उद्योजक महादेव चौगुले यांना पुरस्कार मिळाला आहे.

बेळगाव लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि अलंकार एंटरप्रायझेसचे भागीदार महादेव चौगुले यांना किर्लोस्करवाडी येथे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडतर्फे 2022-23 झिरो पीपीएम अचिव्हमेंटसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री विनय भट्ट यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महादेव चौगुले यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या टॉप मॅनेजमेंट टीमशी बेळगाव येथे किर्लोकर युनिट सुरू करण्याबाबत चर्चा केली असून त्याचा फायदा बेळगावच्या सर्व एमएसएमईंना होणार आहे.Mahadev chougule

किर्लोस्कर समुहाची सुरुवात बेळगावातूनच झाली आहे. बेळगावात किर्लोस्कल समुहाला जागा देण्याबाबत राज्य सरकारला विनंती करण्यात येईल, अशी माहिती चौगुले यांनी दिली.

Potdar election
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे प्लांट हेड एस. सूर्यवंशी, प्रोक्योरमेंट हेड एस. जाधव, व्यवस्थापक श्री बेळगावकर आणि संदीप पाटील, अलंकार ग्रुपचे रोहन चौगुले आणि श्रेयनी चौगुले उपस्थित होते.Markandey

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.