Monday, November 18, 2024

/

शहापूर मधील गणेश मंडळाला येणारे अडथळे होणार दूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर नार्वेकर गल्ली परिसरातील गणेश उत्सवाला गल्लीत असणारे अडथळे आता दूर होणार आहेत शुक्रवारी हेस्कॉम व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या तक्रारीची दखल घेत पाहणी केली.

या परिसरात लोंबकळनाऱ्या विजेच्या तारांचे जंजाळ, स्मार्ट सिटी डेकोरेटिव्ह लाईट साठी बसवलेले भूमिगत वायरिंग पत्र्याचे बॉक्स, विठ्ठल देव गल्ली जंक्शन वरील रस्त्यावर येणारे विद्युत खांब, टेलिकॉम खांबचे अडथळे दूर केले जाणार आहेत.

मध्यवर्ती गणेश महा मंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जन संपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्या सह बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील आदींनी पाहणी करून हेस्कॉमचे सेक्शन अधिकारी प्रवीण बरगाळे,स्मार्ट सिटीचे विठ्ठल मुसाई व रवी मगदूम यांना परिस्थितीची जाणीव करून देत अडथळे दूर करण्याची मागणी केली त्याच बरोबर हेस्कॉम चे अभियंते विनोद केरुर यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधून अडथळे दूर करण्याची मागणी केली.

नार्वेकर गल्लीत स्मार्ट सिटी अंतर्गत डेकोरेटीव्ह विद्युत खांब बसवण्यासाठी भूमिगत विद्युत वहिनी घालून गल्लीत दोन्ही बाजूला सहा पत्र्याचे बॉक्स बसवण्यात आले आहेत त्यानंतर दोन वर्षापूर्वी विद्युत खांब उभे करण्यात आले पूर्वीचे जुने कार्यरत सिमेंटचे इलेक्ट्रिक खांब, नवीन बसवलेले डेकोरेटीव्ह विजेचे खांब आणि सहा पत्र्याचे बॉक्स यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या या गल्लीत गणपती आगमन आणि विसर्जन सोहळा करणे फार जोखमीचे काम झाले आहे यासाठी गणेश उत्सवा पूर्वी सदर डेकोरेटीव्ह खांबावरील लाईट सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली.Ganesh mandal

विठ्ठल देव गल्ली तीन रस्त्यांचे जंक्शन असल्याने या ठिकाणी सतत वाहनांची पादचाऱ्यांची वर्दळ असते हा रस्ता शहापूर भागातील लिंक रस्ता आहे अनेक मंदिरे या ठिकाणी आहेत त्यामुळे गर्दी होत असते. या ठिकाणीचा विद्युत खांब आणि बी एस एन एल खांब पायात अडथळा ठरणारा निळा बॉक्स काढावा अशी मागणी मागील वर्षा पासून गणेश महा मंडळाने लाऊन धरली आहे तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.

आता हेस्कॉम अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विठ्ठल देव गल्लीतील विद्युत खांब काढून जनतेला त्रास होणार नाही अश्या ठिकाणी स्थलांतरित केला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी बाल गणेश मंडळाचे उपाध्यक्ष विराज मुरकुंबी,माजी अध्यक्ष अमित हेरेकर, विनायक बोंगाळे,सागर देशपांडे गौरव अनगोळकर या भागातील व्यापारी नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.