बेळगाव लाईव्ह:नेहमी गुन्हेगारी कारवायांत सामील असलेल्या तिघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांच्या आदेशानुसार त्यांना हिंडलगा काराृहात पाठवण्यात आले आहे.
निकाब ऊर्फ निक्या दस्तगीर पिरजादे (वय 46, रा. अशोकनगर), गजानन मारुती पाटील (वय 40, रा. पहिला क्रॉस गँगवाडी) व शमशुद्दीन गौनरषा मकानदार (वय 38, रा. रुक्मिणीनगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
या तीनही जणांवर गांजा विकन्यासह इतर गुन्हेगारी कारवायांत सहभाग असल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.
माळमारुती पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी त्यांच्यावर कलम 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केला आहे. गणेशोस्तव निमित्त हि कारवाई करण्यात आली आहे.