Thursday, January 2, 2025

/

पिरनवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

 belgaum

पिरनवाडी येथील जैन कॉलेज मैदाना शेजारील खाजगी खुल्या जागेत एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अरबाज रफिक मुल्ला (वय 25, रा. पिरनवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे. काल रात्री पार्टीसाठी बोलावून नेऊन त्याची हत्या करण्यात आल्याचे समजते.

सकाळी कॉलेजला आलेल्या जैन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉलेज मैदाना शेजारील खुल्या जागेत एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी लागलीच त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. सदर माहिती मिळताच स्थानिक डीएसपी आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवलाPiranwadi murder

तत्पूर्वी पोलीस श्वान पथकाला पाचारण करून मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र श्वान पथक कांही अंतरावर जाऊन त्या ठिकाणीच घुटमळले. यावेळी घटनास्थळी कॉलेज विद्यार्थी आणि बघ्यांची गर्दी झाली होती.

अरबाज याच्या खुनाचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी सखोल चौकशी व तपासाअंती त्याचा उलगडा होईल. त्याचप्रमाणे मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड केले जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.