घरात मोबाईल चार्जिंगसाठी लावत असताना विजेचा तीव्र धक्का बसून एक युवक ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी निपाणी येथील श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीत घडली.
मयत दुर्दैवी युवकाचे नाव आकाश शिवदास संकपाळ (वय 27, रा. इंडस्ट्रियल एरिया श्रीपेवाडी) असे आहे आकाश हा आज सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये आपला मोबाईल चार्जिंगसाठी लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला.
हा धक्का इतका तीव्र स्वरूपाचा होता की आकाश जागीच गतप्राण झाला. याबाबतची माहिती आकाशचे वडील शिवदास बळवंत संकपाळ यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याद्वारे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये धाडला. या घटनेची निपाणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.