गेल्या पंधरवड्यात पावसाची जसजशी सुरुवात झाली तेव्हापासून जायंट्स मेनच्या माध्यमातून डोंगराळ भागात सिडबॉलची पेरणी,शहर आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण, बीजरोपन सुरूच आहे.
वेगवेगळ्या विकासाच्या नावाखाली होत असणारी वृक्षतोड आणि त्यामुळे ढासळत चाललेल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जायंट्स मेनची धडपड सुरू असून काल उद्यमबाग येथील गावडे कंपाऊंड आणि अनगोळ रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यक्ष सुनिल मूतगेकर, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, माजी अध्यक्ष मदन बामणे, अशोक हलगेकर,सुनिल भोसले, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसूर व इतरांच्या हस्ते आणि उद्यमबाग येथील कारखानदार मधुकर पाटील यांच्या सौजन्याने हे वृक्षारोपण करण्यात आले.
जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी पाटील यांनी प्रत्येक रोपट्याला जाळीचे आवरण सुद्धा बनवून दिले व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सुद्धा घेतली.
बेळगाव शहर आणि परिसर हिरवागार करण्यासाठी जायंट्स मेन सदैव तत्पर
असल्याचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सुरेश पिसे,राहूल बेलवलकर, नारायण किटवाडकर,भरत गावडे,आनंदकुलकर्णी,अविनाश पाटील,मधू बेळगांवकर,धीरेंद्र मरळीहळ्ळी उपस्थित होते.