बेळगाव लाईव्ह : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया व सर्जन रीजनल कौन्सिल यांच्या तर्फे दोन दिवसीय ‘टॅक्स क्लिनिक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डायरेक्ट टॅक्स कमिटी ऑफ आय. सी.ए. आय. अँड पब्लिकेशन यांच्या मार्गदर्शन व आयकर विभाग यांचा सहकार्याने दोन दिवसीय टॅक्स क्लिनिक या कार्यक्रमांतर्गत चर्चा सत्र घेण्यात येत आहे.
टिळकवाडी येथील स्वरूप प्लाझा येथे आयोजित कार्यक्रमात सीए. विरणा मुरगोड, सी. एम. तिगडी, राजगोपाल पार्थसारथी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ‘कर’ या विषयासंदर्भात जनतेत जागृती निर्माण होणे, शिवाय स्वतः कर कसा भरावा या संदर्भात थोडक्यात माहिती मिळावी, नागरिकांच्या शंकाचे निरसन करणे हा एकमेव उद्देश ठेऊन संपूर्ण देशभर प्रथमच हा आगळा वेगळा उपक्रम राबवत असल्याची माहिती सी.ए. राजंद्रा मुंदडा यांनी दिली.
या कार्यक्रमाला बेळगावमधील अनेक चार्टर्स अकाउंटंट्स आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
चार्टर्स अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे 'टॅक्स क्लिनिक' काय सांगतात डॉ राजेंद्र मुंदडा pic.twitter.com/zLNJ3ojVt7
— Belgaumlive (@belgaumlive) July 13, 2023