Wednesday, December 25, 2024

/

एस पी संजीव पाटील दाखवली कार्यतत्परता.. कर्तव्यदक्षता

 belgaum

चिकोडी हिरेकोडीच्या नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य श्री 108 कमकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा छडा लावण्यात बेळगाव पोलिसांना यश आले हे यश निःसंशयपणे एसपी संजीव पाटील यांना जाते.

जैनमुनी बेपत्ता झाल्याची तक्रार समजताच आश्रमात दाखल झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी आरोपींना शोधून अटक करण्यापासून ते ऋषीचा मृतदेह बाहेर काढणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व व मार्गदर्शन केले अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या प्रकरणाला अत्यंत बारकाईने सावरत कर्तव्यदक्ष पणाची चुणूक दाखवली.

जैन मुनी बेपत्ता झाल्याची बाब लक्षात येताच चिकोडीला कारवाईत गेलेल्या एसपींनी आश्रमाला भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले. त्यांनी तत्काळ आरोपीला अटक करून चौकशी केली आणि हत्येचे रहस्य उलगडण्यात यश मिळवले.

मृतदेहाबाबत आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलीस आपल्या सहकाऱ्यांसह रायबाग तालुक्यातील कटकभावि फार्म येथे रात्री पोहोचले आणि शोधासाठी आवश्यक तयारी केली.पहाटे चार वाजल्यापासून मृतदेह ताब्यात घेण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. मृतदेह बाहेर काढून मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेईपर्यंत एसपी संजीव पाटील हे घटनास्थळीच राहिले आणि विश्रांती न घेता निरीक्षण केले याच चुणूक पणाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले.Bgm police jain muni

शोध मोहिमेत बेळगावचे एसपी, बेळगावचे अतिरिक्त एसपी, डीएसपी बसवराज यलीगर विरेश दोडमणी, सीपीआय आरआर पाटील, बेळगाव जिल्हा सायबर क्राईम सीपीआय बी आर गडेकर यांच्यासह सुमारे 500 पोलीस कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हा अधीक्षकांना साथ दिली हे देखील तितकेच कौतुकास्पद आहे.

एकूणच या प्रकरणाचा शेवटपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेचे जनतेतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.