अथणीजवळील कृष्णा नदीत अवैधरित्या वाळू भरणारे चार जेसीबी आणि २३ ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले.
कृष्णा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रार होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांनी छापा टाकला.
पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील अनेक बेकायदा कामावर टाच आणली आहे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वर धडक कारवाई केली आहे.
अवैध वाळूचा उपसा झाल्याने नद्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे त्याच बरोबर पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदी परिसर चिकोडी अथणी तालुका व्यतिरिक्त खानापूर मलप्रभा नदी,गोकाक घटप्रभा नदीवर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत होती मात्र पोलिसांनी त्यावर अंकुश आणण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.
पर्यावरणाचा रहास करणाऱ्या या मंडळींवर चाप बसवणे निश्चित गरजेचे होते अश्यावेळी पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी मोठी कारवाई वाळू माफिया वर केली आहे ही बाब कौतुकास्पद मानली जात आहे.
एकीकडे कारवाई झाल्या नंतर काही दिवसांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी चिरीमिरी न घेता बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यावर कायम स्वरुपी चाप बसवणे गरजेचे आहे.