बेळगाव लाईव्ह : आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे किंवा कायमस्वरूपी स्वावलंबी राहता येणे हा आर्थिक नियोजनामागचा मुख्य हेतू असतो. यासाठीच उत्तम आर्थिक नियोजन करण्यासाठी आपल्यासमोर अनेक स्रोत उपलब्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे शेअर मार्केट! सध्या शेअर मार्केटने सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. यादरम्यान अनेकजण शेअर मार्केटमध्ये प्रवेश घेण्यासाठी संधी शोधत असतो. कित्येकांना अल्पज्ञान, अर्धवट ज्ञान, चुकीची माहिती, सोशल मीडियावरील गुंतागुंतीची माहिती अशा कारणांमुळे या संधीचा फायदा घेता येत नाही आणि अनेकांची निराशा होते. शेअर मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी याबद्दलचे अचूक ज्ञान आणि माहिती आपल्याकडे असणे हि अत्यावश्यक बाब आहे.
आज सोशल मीडियावर शेअर मार्केट संदर्भात अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र बहुतांशी लोक सोशल मीडियामुळे शेअर मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या गोष्टींचा आणि चुकीच्या टेक्निकचा अवलंब करून मोठी जोखीम उचलतात. परिणामी यामुळेच शेअर मार्केटसंदर्भात अनेक गैरसमज निर्माण होतात. शेअर मार्केटसंदर्भात आपल्याकडे इत्यंभूत माहिती उपलब्ध असेल तर यापेक्षा सोपा आणि उत्तम व्यवसाय आपल्याला मिळणार नाही. बेळगावमध्ये आपल्या भाषेत, सहज आणि सोप्या पद्धतीने शेअर मार्केटसंदर्भातील इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’ कार्यरत आहे. गेल्या 12 वर्षांपासून बेळगावमध्ये शेकडो जणांना शेअर मार्केटसंदर्भातील प्रशिक्षण या संस्थेने दिले आहे.
कोविड कालावधीत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून शेकडो जणांना पर्याय उपलब्ध करून देत आर्थिक स्रोत निर्माण करून देण्यात हि संस्था यशस्वी ठरली आहे. ज्या काळात कित्येकांना आर्थिक नियोजनाअभावी फटका सहन करावा लागला अशा कोविड काळात शेकडो जणांना घरबसल्या उत्तम आर्थिक स्रोत निर्माण करून देण्यात ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’ने हातभार लावला आहे. आज या संस्थेतील कित्येक विद्यार्थी शेअर मार्केट क्षेत्राला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पाहत असून यशस्वीरीत्या काम करत आहेत.
सध्या मान्सूनचा हंगाम सुरु आहे. यादरम्यान कित्येक उद्योग-व्यवसाय मंदावतात, प्रत्येकाला आर्थिक नियोजनात काटकसरीचा मार्ग अवलंबावा लागतो. आपल्या देशात काही मोजकेच समाज शेअर मार्केटकडे सकारात्मक पद्धतीने पाहतात. मात्र आजही आपला समाज शेअर मार्केटला जोखीम समजतो. ज्याप्रमाणे अमेरिका आणि युरोप खंडात शेअर मार्केट संदर्भात जनजागृती आहे त्याप्रमाणे भारतासारख्या प्रगतीपथावरील देशात अद्याप जनजागृती झालेली नाही. स्टॉक एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) देशभरात शेअर मार्केट संदर्भात जनजागृती करत आहे. शेअर मार्केटमध्ये अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांनी प्रवेश घ्यावा, यातील जोखीम, उलाढाली, गुंतवणूक अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून शेअर मार्केटच्या दिशेने वळावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
पावसाळ्यात साधारण 3 ते 4 महिने प्रत्येक व्यावसायिकाला कामाची कमतरता भासते. हि कमतरता कशापद्धतीने , कोणत्या स्वरूपात भरून काढावी, यादरम्यान होणारी वित्तीय तूट कशी भरून काढावी यासाठी प्रत्येक व्यावसायिक प्रयत्नशील असतो. पावसाळ्यात आपल्यासमोर उभारणाऱ्या अशा अनेक समस्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून आपण शेअर मार्केटचा विचार नक्कीच करू शकतो. बेळगावमधील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने शेअर मार्केट संपूर्ण जाणून घ्यावे या हेतूने ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून सहज, सोप्या आणि आपल्या मातृभाषेतून प्रशिक्षण पुरविण्यात येत आहे.
अत्यंत माफक फी आकारून केवळ आणि केवळ आपल्या समाजातील प्रत्येकाने या क्षेत्रात उतरून प्रगती साधावी यासाठी हि संस्था कार्यरत आहे. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात प्रशिक्षण देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून शेअर मार्केट संदर्भातील कोणत्याही प्रकारची माहिती जाणून घ्यावयाची असल्यास ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’, तिसरा मजला, सिटी प्लाझा, कृष्णदेवराय सर्कल, बेळगाव, संपर्क : 9663071757 येथे संपर्क साधावा.