गेल्या सहा दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शाळांना सोमवारी 24 रोजी सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागासह खानापूर तालुका आणि कितुर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना सोमवार 24रोजी सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
काल शनिवारी 22रोजी केवळ खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती मात्र गेल्या दोन दिवसांत बेळगावात देखील पावसाचा जोर वाढला आहे.
त्यामुळे रविवारी जनजीवन विस्कळित झाले आहे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सोमवारी शाळांना सुट्टीची माहिती दिली आहे.