बेळगाव लाईव्ह : लिव्हर ट्रान्सप्लँटची गरज असलेले रुग्ण बाजीराव सुळकुडे यांच्या उपचारासाठी शहरातील गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडीयम शाळेकडून आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
शहापूर येथील गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडीयम शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांनी रुग्णाचे बंधू के. एस. सुळकुडे यांच्याकडे सहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी बोलताना भातकांडे म्हणाले, या रुग्णाला लिव्हर उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची बाब समाजसेवक विजय मोरे व संतोष दरेकर यांनी कानावर घातली. त्यामुळे आमच्या शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वखुशीने पैसे दिले. ती रक्कम देत असून पुढील काळात आणखीन आर्थिक मदत करू असे सांगितले.
यावेळी माजी महापौर व समाज सेवक विजय मोरे यांनी, जबाबदार नागरीक म्हणून समाजोपयोगी कार्यात हातभार लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गजाननराव भातकांडे शाळेचे त्यांनी आभार माणात शहरातील इतर संस्थांसह दानशूर व्यक्तींनीही मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी समाजसेवक संतोष दरेकर, प्राचार्या प्रेमलता पाटील, समाजसेवक अँलन मोरे यांच्यासह संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सदर रुग्णाला आर्थिक मदत पोहोचविण्यासाठी बँक खाते क्रमांक 19390100033095, IFSC: FDRL0001939 किंवा फोन पे अथवा गुगल पे साठी 9632731806 या क्रमांकावर मदत करावी.