बेळगाव शहर आणि तालुका खानापुर, मुडलगी, सौंदत्ती, यरगट्टी, निप्पाणी तालुक्यातील शाळांना बुधवारी (२६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी (26 जुलै) मुसळधार पावसामुळे खानापूर, निप्पाणी, मुडलगी, यरगट्टी आणि सौंदत्ती, बरोबर तालुक्यातील प्राथमिक-उच्च शाळांना आणि फक्त खानापूर तालुक्यातील पीयू महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वरील तालुक्यांना तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे खानापूर केवळ खानापूर तालुक्यातील शाळा व्यतिरिक्त पीयूसी कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬೆಳಗಾವಿ, ಖಾನಾಪುರ, ಮೂಡಲಗಿ, ಸವದತ್ತಿ, ಯರಗಟ್ಟಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲ್ಲೂಕುಗಳ ಪ್ರಾಥಮಿಕ-ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಬುಧವಾರ(ಜು.26) ರಜೆ ಘೋಷಣೆ: ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ @CMofKarnataka @KarnatakaVarthe
— DIPR BELAGAVI (@BelagaviDipo) July 25, 2023
बेळगाव शहर परिसरात देखील मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती त्यामुळे अनेकांनी बेळगाव तालुक्यातील शाळा सुट्टी आहेत का ?याबाबत विचारणा करत होते. रात्री उशिरा बेळगाव शहर आणि तालुक्यातील शाळांना सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील सहा तालुक्यातील अंगणवाडी शाळांना देखील सुट्टी असणार आहे.
बेळगाव जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.