गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून खानापूर तालुक्यामधल्या शाळा कॉलेजेस ना सुट्टी देण्यात आलेली आहे.
अपेक्षेप्रमाणे खानापूर तालुक्यातच सरासरी या महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे तर रामदुर्ग तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्यात खानापूर तालुक्यात 756 मी मी पावसाची नोंद तर रमदुर्ग तालुक्यात केवळ 64 मी मी सर्वात कमी पाऊस पडला आहे.
बेळगाव तालुक्यात जुलै महिन्यात 455 मी मी पाऊस पडला आहे या शिवाय अथणी 65 मी मी, बैलहोंगल मध्ये 129 मी मी,चिकोडी 134 मी मी गोकाक मध्ये 68 मी मी,हुक्केरी मध्ये 150मी मी, कागवाड मध्ये 68.5 मी मी,कित्तूर् मध्ये 270मी मी, मुडलगी मध्ये67 मी मी निपाणी 201 मी मी, रायबाग मध्ये 74 मि मी आणि सौंदत्ती मध्ये 76मी मी पाऊस नोंद झाला आहे.
तीन दिवसात वाढला पाऊस
गेल्या तीन दिवसात म्हणजे 23 ते 25 जुलै दरम्यान खानापूर मध्ये 716 तर बेळगाव तालुक्यात 416 मी मी पाऊस पडला असून त्या खालोखाल कित्तुर मध्ये 353मी मी निपाणी मध्ये 216 मी मी तर बैलहोंगल मध्ये 175 मी मी पाऊस पडला आहे.