बेळगाव लाईव्ह : जून महिन्यात लांबलेल्या मान्सूनने जुलै महिन्यात हजेरी लावली असून अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडत नाही.
गेल्या दहा दिवसात बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरु असून बेळगाव तालुक्यात ७०.२ मिमी पाऊस झाला आहे.
अथणी तालुक्यात गेल्या दहा दिवसात १६.६ मिमी, बैलहोंगल मध्ये २६.० मिमी, चिकोडीमध्ये ४३.० मिमी, गोकाक तालुक्यात ८.२ मिमी, हुक्केरीमध्ये २७.९ मिमी, कागवाडमध्ये २०.६ मिमी, खानापूर तालुक्यात सर्वाधिक १८१.२ मिमी,
कित्तुर मध्ये ७.३ मिमी, मूडलगी तालुक्यात ३२.८ मिमी, निपाणी तालुक्यात ५८.२ मिमी, रायबाग तालुक्यात २२.१ मिमी, रामदुर्ग तालुक्यात १२.४ मिमी आणि सौंदत्ती तालुक्यात २६.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.