Tuesday, January 28, 2025

/

पावसामुळे दूधसागर नजीक रेल्वे मार्गावर कोसळली दरड

 belgaum

पश्चिम घाटात होणाऱ्या दमदार पावसामुळे नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील ब्रागांझा घाट प्रदेशातील दूधसागर -सोनावळी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली. त्यानंतर दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. यामुळे दूधसागर धबधबा पाहण्यास गेलेल्या पर्यटकांसह रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल झाले.

दूधसागर व कॅसलरॉक परिसरात काल रविवारी मुसळधार पाऊस झाला. परिणामी सायंकाळी दूधसागर -सोनावळी दरम्यानच्या टनेल क्र. 12 नजीक रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

  1. हा संपूर्ण घाट परिसर असल्याने दरड हटविण्याच्या कामाला वेळ लागत होता. नैऋत्य रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग दरड हटविण्यासाठी कार्यरत होता. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे क्र. 12779 वास्को -निजामुद्दीन गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस सोनावळी रेल्वे स्थानकातच थांबविण्यात आली होती. दरड हटविण्याचे काम पूर्ण होताच रात्री या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेचे जनसंपर्कप्रमुख अनिश हेगडे यांनी दिली आहे. से

दरम्यान, नैऋत्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम घाटात थांबून ठेवलेल्या गोव्याच्या मालवाहू रेल्वेला रात्री 8:30 वाजता वाहतुकीची परवानगी देण्यात आली. त्यानंतर रात्री 9:30 वाजता सोनावळी येथे थांबून ठेवलेल्या गोवा सुपरफास्ट एक्सप्रेसला पुढे मार्गक्रमण करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला.

 belgaum

नैऋत्य रेल्वेतर्फे दरवर्षी दूध सागर जवळ आणि घाट विभागात मान्सून पूर्व कामे केली जातात यंदा देखील ही कामे केली होती त्यासाठी आवश्यक साहित्य ठेवण्यात आले होते त्यामुळे काल रविवारी दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेता आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.