गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, हुक्केरी आणि खानापूर वगळता इतर सर्व ठिकाणी जुलै महिन्यातील आपल्या सर्वसामान्य सरासरीचे प्रमाण ओलांडले आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत खानापूर तालुक्यात सर्वाधिक 752.4 मि.मी. तर त्या खालोखाल बेळगाव येथे 439.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव शहर परिसरात दरवर्षी जुलै महिन्यात सर्वसामान्यपणे सरासरी 455 मि.मी. पावसाची नोंद होत असल्यामुळे अद्याप 15.6 मि.मी. पाऊस पडणे बाकी आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी जुलैमध्ये खानापूरात 756 मि.मी. इतका सरासरी पाऊस पडतो.
त्यामुळे यंदा ही सरासरी गाठण्यासाठी अजून 3.6 मि.मी. पावसाची गरज आहे. हुक्केरीची जुलै महिन्यातील सरासरी 150 मि.मी. इतकी आहे मात्र अद्याप या ठिकाणी 140.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे अथणी, बैलहोंगल, चिक्कोडी, गोकाक, कागवाड, कित्तूर, मुडलगी, निपाणी, रायबाग, रामदुर्ग व सौंदत्ती येथे आजपर्यंत जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, आज बुधवारी 26 जुलै रोजी बेळगाव शहर परिसरात 23.4 मि.मी. तर खानापूर तालुक्यात 36.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या चार दिवसात पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे पर्जन्यमापन केंद्र : जुलै मधील सर्वसामान्य पाऊस – दि. 23, 24, 25, 26 रोजी पडलेला पाऊस, आणि एकूण पाऊस यानुसार) खालील प्रमाणे आहे.अथणी एचबीसी : सर्वसामान्य पाऊस 65 मि.मी. – दि. 23 रोजी 5.6 मि.मी., दि. 24 रोजी 6.2 मि.मी., दि. 25 रोजी 4.2 मि.मी., दि. 26 रोजी 13.8 मि.मी., एकूण पाऊस 95.3 मि.मी.. बैलहोंगल आयबी : 129 मि.मी. – 18.0 मि.मी., 30.4 मि.मी., 7.4 मि.मी., 7.4 मि.मी., 17.0 मि.मी.. बेळगाव आयबी : 455 मि.मी., – 31.2 मि.मी., 73.2 मि.मी., 19.4 मि.मी., 23.4 मि.मी., 439.4 मि.मी.. चिक्कोडी : 134 मि.मी. – 35.4 मि.मी., 9.2 मि.मी., 6.2 मि.मी., 15.5 मि.मी., 182.3 मि.मी.. गोकाक : 68 मि.मी. – 8.1 मि.मी., 6.1 मि.मी., 2.4 मि.मी., 7.0 मि.मी., 81.7 मि.मी.. हुक्केरी एसएफ : 150 मि.मी. – 22.3 मि.मी., 12.1 मि.मी., 8.4 मि.मी., 7.8 मि.मी., 140.2 मि.मी.. कागवाड (शेडबाळ)
: 68.5 मि.मी. – 10.6 मि.मी., 13.2 मि.मी., 3.6 मि.मी., 15.8 मि.मी., 130.8 मि.मी.. खानापूर : 756 मि.मी. – 53.1 मि.मी., 98.7 मि.मी., 37.8 मि.मी., 36.1 मि.मी., 752.4 मि.मी.. कित्तूर : 270 मि.मी. – 28.6 मि.मी., 62.2 मि.मी., 15.2 मि.मी., 28.3 मि.मी., 381.8 मि.मी.. मुडलगी : 67 मि.मी. – 8.1 मि.मी., 6.0 मि.मी., 8.2 मि.मी., 9.4 मि.मी., 114.0 मि.मी.. निप्पाणी आयबी : 201.8 मि.मी. 49.6 मि.मी., 15.4 मि.मी.,
7.6 मि.मी., 9.0 मि.मी., 269.3 मि.मी.. रायबाग : 74 मि.मी. – 16.0 मि.मी., 7.0 मि.मी., 6.2 मि.मी., 12.5 मि.मी., 106.7 मि.मी.. रामदुर्ग : 64 मि.मी. – 3.4 मि.मी., 9.4 मि.मी., 2.4 मि.मी., 6.1 मि.मी., 78.5 मि.मी.. सौंदत्ती : 76 मि.मी. – 13.6 मि.मी., 12.2 मि.मी., 6.8 मि.मी., 9.0 मि.मी., 128.6 मि.मी..