बेळगाव जेएमएफसी न्यायालय आवारातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असल्यामुळे वकिलांनी काळजी घ्यावी आणि आपली वाहने शिस्तबद्धरीत्या पार्क करावीत, असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनतर्फे एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
बेळगाव जेएमएफसी न्यायालय आवारात वकीलांनी आपली वाहने व्यवस्थित पार्क करण्याबरोबरच कारवर स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून पुढील काचेला आतील बाजूने चिकटवावा.
जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला कार पार्किंग करताना किंवा आपले वाहन बाहेर काढताना अडचण आल्यास संबंधित वकिलाला संपर्क साधता येईल.
मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीशांनी बार असोसिएशनला पार्किंगबाबत सूचना केली आहे. न्यायालय आवारात योग्य प्रकारे पार्किंग करावे.
त्याचबरोबर पोलिसांनी देखील न्यायालय आवारात होमगार्ड थांबून पार्किंगला शिस्त लावावी असे निर्देशही मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दिले असल्याचे बार असोसिएशनतर्फे सरचिटणीस ॲड. गिरीराज पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.