बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने १९ जुलै पासून सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रामध्ये गर्दी होत आहे.
या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या अंतर्गत आज मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहेत.
खाजगी खाजगी ऑनलाईन सेंटर वरून ग्राम वन केंद्राची आय डी वापरून गृहलक्ष्मी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांकडून 250 रुपये घेणाऱ्या केंद्राला अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या गृहलक्ष्मी योजने अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिला सदस्याला प्रतिमहिना २००० रुपये देण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन केंद्राच्या माध्यमातून अर्ज भरणा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. १९ जुलै रोजी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी महिलांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. मात्र काही ऑनलाईन केंद्रावर नोंदणी साठी पैसे आकारत असल्याची माहिती पुढे आली.
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पैसे आकारणाऱ्या ऑनलाईन केंद्रांना इशारा दिला होता. मात्र अद्यापही काही ठिकाणी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
शहरातील चव्हाट गल्ली येथील ऑनलाईन केंद्रावर एका अर्ज नोंदणी साठी दोनशे पन्नास रुपये वसूल केले जात होते मुतगा ग्राम वन केंद्राची आय डी शहरात वापरली जात होती आज प्रशासनाने मुतगा येथे जाऊनटाळे ठोकून कारवाई करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण खात्याचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी सदर कारवाई केली आहे.