वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून येत्या शनिवार दि. 22 जुलै 2023 पासून दर रविवारी तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बेळगाव येथून गोकाक आणि अंबोली या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
परिवहन मंडळाची बेळगाव -गोकाक विशेष बस सकाळी 9 वाजता मध्यवर्ती बस स्थानक बेळगाव येथून सुटेल. त्यानंतर ती सकाळी 10 वाजता हिडकल डॅम येथे पोहोचेल. तेथून 11 वाजता निघून गोडचीनमलकी येथे 11:30 वाजता पोहोचेल.
तिथून दुपारी 1 वाजता सुटून ही बस 1:30 वाजता गोकाक फॉल्सच्या ठिकाणी पोहोचेल. गोकाक फोल्स येथून दुपारी 4 वाजता सदर बस बेळगावकडे प्रस्थान करेल आणि मध्यवर्ती बस स्थानक येथे सायंकाळी 6 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे बेळगाव -आंबोली विशेष बस बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक येथून सकाळी 9 वाजता आंबोलीच्या दिशेने प्रस्थान करेल.
ही बस प्रथम सकाळी 11 वाजता नागरतास धबधब्याच्या ठिकाणी थांबेल. तिथून 12 वाजता सुटून दुपारी 12:30 वाजता ती आंबोली धबधब्याच्या ठिकाणी पोहोचेल अंबोली येथून दुपारी 4 वाजता सुटून ही बस पुन्हा सायंकाळी 6 वाजता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचेल.
गोकाक व आंबोली येथील ही बस सेवा म्हणजे परिवहन मंडळाकडून पर्यटकांसाठी एक विशेष पॅकेज असल्यामुळे महिलांसाठीची मोफत बस प्रवासाची ‘शक्ती योजना’ या बस सेवेसाठी लागू नसेल. त्यामुळे या विशेष बस सेवेचा लाभ घेणाऱ्या महिलांना तिकीट काढावे लागणार आहे. सदर विशेष पर्यटन बस सेवेसाठीचे बुकिंग www.ksrtc.in या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7760991612, 7760991613 किंवा 7760991625 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Please Golak falls che photo taka na latest.