केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन कॉल्स करण्याची योजना बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात स्लीपर सेलचे नियोजन आणि भरतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा लष्कर -ई -तोयबाचा (एलईटी) संचालक मुख्य आरोपी अफसर पाशा याची होती. ती योजना कारागृहातील सहआरोपी जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याने अंमलात आणली, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.
चौकशीसाठी बेळगावात दाखल झालेले नागपूर शहर पोलिसांचे पथक पाशाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयामध्ये खंडणीसाठी धमकीचे फोन केल्याचे दोन गुन्हे पोलिसांनी अफसर पाशाच्या नावावर नोंदवले आहेत.
यापूर्वी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याने बेळगाव कारागृहातील अंडा सेलमध्ये स्वतःजवळ बाळगलेले सेल फोन आणि सिम कार्ड्स जप्त केले आहेत. आता पोलिसांकडून कारागृहातील पाशाच्या कोठडीचीही झडती घेतली जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच पाशा आणि पुजारी हे दोघे मिळून माजी उपमुख्यमंत्री ई. एस. ईश्वरप्पा यांचे उच्चाटन करण्यासाठी कट शिजवत होते.
एका महिलेचा न्यायालयीन जबाब आणि बेळगाव कारागृहातील सहकारी कैद्यांनी दिलेल्या माहितीवरून मंत्री गडकरी खंडणी प्रकरणात पाशाचा मोठा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुजारी याच्याप्रमाणे अफसर पाशा देखील विस्फोटकं अर्थात बॉम्ब तयार करण्यात तरबेज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलईटचा संचालक अफसर पाशा हा ढाका, बांगलादेश येथे 2003 मध्ये आणि बेंगलोर येथे 2008 मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्या मागचा मास्टरमाइंड आहे.
कारागृहात त्यानेच पुजारी याला आपल्या मोहिमेत सामावून घेतले. देशात बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचा माजी राष्ट्रीय सचिव असलेल्या पाशानेच पुजारी याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या खंडणीसाठी धमकीचे फोन करण्यास सांगितले होते.
News source :times of India
- https://m.timesofindia.com/city/nagpur/let-recruiter-pasha-mastermind-behind-extortion-calls-to-gadkari-office-cops/articleshow/101737673.cms